दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनानिमित्त जीवन फाउंडेशनच्या वतीने उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील कुमार व कन्या विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी छोटासा हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, जीवन फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अशाच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!